शेतकरी आत्महत्या करत आहे. अश्यातच सुतार लोहार समाजाकडे काम शिल्लक राहिले नाही. शेतकर्यांच्या बलुत्यावर गावातील लाकडी वस्तू तसेच लोखंडी कामावर अवलंबून असलेला वर्ग शहराकडे धाव घेत आहे. तिथे मिळेल ती मजुरी काम करत आहे परंतु शहरात त्याचा राहण्याचा प्रश्न उधभवत आहे कला,कुशल, कौशल्य प्रावीण्य असलेला वर्ग अस्ताव्यस्त होऊन नष्ट होण्याच्या नियमाप्रमाणे मार्गावर दिसून येत आहे. कृपया त्यांना न्याय मिळण्यासाठी खालील मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती विश्वकर्मा विराट संघ, विश्वकर्मा समन्वय समिती, व बारा बलुतेदार महासंघातर्फे करण्यात आले आहे १) नागरी जमीन (कमाल धारणा : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना महाआघाडीने सुरू करून अठरा पगड जातीत बारा बलुतेदार उदरनिर्वाहात सक्षम व्हावा.बाराबलुतेदार सन्मान योजना सुरू करून गावगाड्याच्या कर्मात पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षापासून कार्यरत असलेल्यांना शेतकऱ्याचे शेतीचे अवजारे, शेतकऱ्याचे लाकडी लोखंडी कामाच्या सेवेत असलेल्या सुतार लोहार समाजाला शेत जमिनी मिळाव्यात निसर्गाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्याचा हाता तोंडाशी आलेल्या घास निसर्ग हिसकावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला
बलुतेदारातील उपेक्षित सुतार, लोहार, सोनार, या वर्गाना राजकीय सामाजिक शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात न्याय मिळावा
• Sina samachar