सुर्डी गाव तस प्रसिद्धी पासून दूर असेलेलंच होतं परंतु गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक घेऊन गावची ओळखच बदलली, पाणीदार सुर्डी मध्ये पाणीदार अधिकारी ही घडत आहेत.सुर्डी मधील परिस्थितीच भांडवल न करता जीवनाशी संघर्ष करत अधिकारी झालेला जीवन डोईफोडे मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय आपण प्राप्त करू शकतो याची प्रचिती जीवन जालिंदर डोईफोडे या पाणीदार सुर्डी गावातील यवकाने सिद्ध करून दाखवले आहे.अतिशय बिकट परिस्थितीशी सामना करत. आई वडील संसाराचा गाडा हाकत शिक्षण होते. जीवन डोईफोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक च्या परीक्षेत राज्यात आठवाक्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले होते. घरात अठराविश्व दारिद्रय त्यात शेतीमध्ये पिकत नसे दुष्काळी परिस्थितीने ग्रासलेल्या गावात मोलमजुरी करून आई भिवराबाई पोराला मोठं करायचं सपान बगत होती.जीवनच आयुष्य संघर्षमय होतं.आर्थिक संकटातून हे कुटुंब जात असतांना.दोन दुभत्या गायी घेऊन आई,वडील जीवनाला शिकवत होते याची जाणीव जीवनला पावलो पावली येत होती.आई वडिलांनी ही जीवनच्या शिक्षणास अडथळा येऊ दिला नाही.कारण आपल्या मुलानेही अधिकारी व्हावे अशी आईची प्रबळ इच्छाशक्ती होती.अशातच जीवनही दिवसभर गायी सांभाळत आपले शिक्षण पूर्ण करत होता.आर्ट मधून तो बी.ए. पूर्ण केला.परंतु घरच्या परिस्थितीमुळे तो सुट्टीच्या दिवशी विहरीवर, शेतात कामाला जात असे त्या पैशातून आई
आईच्या कष्टानं मला पोलीस उपनिरीक्षक घडवलं : जीवन डोईफोडे -1