आईच्या कष्टानं मला पोलीस उपनिरीक्षक घडवलं : जीवन डोईफोडे -2

सामाजिक वडिलांना मदत होईल व आथिर्क भार कमी होईल.व राहिलेल्या वेळात अभ्यास करत असे जीवनने कोणताही क्लासन लावता चांगल्या गुणांनी नेहमीचं उत्तीर्ण होत असे. एक एक डोंगर सर करत असताना,संकटे साथ सोडत नव्हती अश्यातच एक दिवस वडिलांचं छत्र हरपलं आणि सर्व जबाबदारी सामाजिक शैक्षणिक व उद्योग आईवरती आली.सर्व आथिर्क कारभार बिगडला जास्तीचं काम करावं लागतं असे.घर चालवण्यासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी आई दसऱ्याच्या शेताला जाऊन पै पै गोळा करत होती आणि आपला विस्कटलेला संसार नीट करू पाहत होती, आईचे कष्ट पाहून जिवनची ही अधिकारी होण्याची इच्छा तीव्र झाली होती,पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, एम.बी.ए.ला नंबर लागला.पुढच्या शिक्षणासाठी सुर्डी सोडून पुणेला जावं लागलं.उच्च पदवीचे शिक्षण घेत असतांना आईचे कष्ट समोर दिसत होते त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न आणखी बळकट होत असे. शिक्षण घेत असतांना परिस्थितीचं भांडवल कधी केलं नाही जीवनने उच्च पदवी पूर्ण झाल्यावर. एच.डी.एफ.सी.बँकेत नोकरी चालू केली नोकरी करत असताना अधिकारी होण्याचे जीवन डोईफोडे स्वप्न खुणावत होते. मग बँकेतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचा,शासकीय सेवेत जाण्याचा चंगच बांधला अधिकारी झाल्याशिवाय गावी सुर्डीला जायचं नाही हे ठरवलं होतं.पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं नाही परंतु चिकाटी सोडली नाही हार मान्य करायची नाही अशी अनेक संकटे आजपर्यंत पचवली आहेत.अधिकारी होऊन आईचे स्वप्न पूर्ण करायचे अशी खूणगाठ मनाशी बांधली होती.अपार कष्ट,मेहनत करत मध्ये तो राज्यसेवा परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आठवा आला आणि शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार झालं.डिसेंबर २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकच खडतर प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण करून आज मितीला मुंबई मध्ये मालाड पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नव्या कारकिर्दीला सुरवात केली आहे.